Politics | नितीन गडकरींनी व्हिएसआर विमान प्रवास टाळावा- रोहित पवार; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

विमान कंपनीवर गंभीर आरोप

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १४.४ | रयत समाचार

(Politics) कै. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित प्रकरणानंतर व्हिएसआर या खासगी विमान कंपनीवर गंभीर आरोपांचा भडका उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनी मोठ्या प्रमाणावर गैरकारभारात गुंतलेली असून कंपनीकडून कोणतेही नियम व कायदे पाळले जात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

(Politics) रोहित पवार यांनी सांगितले की, व्हिएसआर कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून याबाबत त्यांनी सातत्याने पुराव्यानिशी मुद्दे मांडले आहेत. तरीदेखील संबंधित यंत्रणांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

(Politics) दरम्यान, सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विशेष सल्ला दिला आहे. “दिल्लीत सत्ताधारी पक्षातील महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा आणि अजातशत्रू नेतृत्व असलेल्या नितीन गडकरी यांनी व्हिएसआर कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळावा,” असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, गडकरी यांच्या कार्यालयाने जर हे विमान बुक केले असेल, तर त्यांना तत्काळ सूचना देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. याशिवाय, हे विमान केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून बुक झाले असल्यास, विमान मंत्री आणि व्हिएसआर कंपनीमधील आर्थिक संबंधांमुळे सुरक्षेपेक्षा व्यवसायाला प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
या सर्व आरोपांमुळे व्हिएसआर कंपनी आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading