(Mumbai news) ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स डेव्हलपमेंट (टीआईएसडी) यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेला देशभरातून ५०४ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
(Mumbai news) कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक सहायक पोलीस निरीक्षक, विशेष शाखेचे विशाल वाघमारे, राहूल पवार, छाया खोडके आणि आर्मी रिटायर्ड डी.डी. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादनाने केली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
(Mumbai news) टीआईएसडीच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला प्रोत्साहन मिळाले असून संविधानाच्या उद्दिष्टांप्रती जागृती होण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. प्रमुख पाहुण्यांनी टीआयएसडीच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याची सदिच्छा व्यक्त केली.
स्पर्धेतील विजेते
पहिला गट (३री ते ६ वी) – प्रथम क्रमांक: संचित वसंत ढगे
दुसरा गट (७वी ते १०वी) –प्रथम क्रमांक: अपूर्वा रुपेश नलवडे
द्वितीय क्रमांक: साक्षी सचिन वीर
तृतीय क्रमांक: स्वयंम विनय पाटील
उत्तेजनार्थ – सोहन सदाशिव कुंभार, साक्षी रामचंद्र कवठेकर, राज प्रमोद कांबिरे, आर्यन अधिक मांडवेकर, श्रावणी आनंदराव निकम, आर्या निलेश तेलगे, प्रणय पवनकुमार डवंगे, गौरी दत्तात्रय पवार,अर्जुन पूजा हर्षद चव्हाण.
खुला गट – प्रथम क्रमांक: सुभाष बन्सी साळवे
द्वितीय क्रमांक: वैभवी विनित गावडे
तृतीय क्रमांक: अनिल शहादराव त्रिभुवन
उत्तेजनार्थ – विक्रम केरू पारखे, निशा श्रीपाल जाधव, भोसले संतोष भगवान, वीणा रुपेश होळकर, सुनिल जुलाल सोनवणे, ममता दिलीप मोरे, धनराज रघुनाथ दुर्योधन, गौतम अशोकजी शेंडे, विनोद गोविंदा सोनुने, अरुण शंकर जाधव, अविराज यशवंत गोरीवले, पूजा हर्षद चव्हाण.
स्पर्धेतील विजेत्यांनी टीआयएसडीच्या संकल्पनेचे कौतुक करत अशा उपक्रमांची देशपातळीवर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टीआयएसडीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी आणि नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, प्रदीप मुंडे आणि चेतन बनसोडे यांचे अल्पोपहार व्यवस्थेसाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
Your Trusted Source for Accurate and Timely Updates!
Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.