मुंबई | १७ मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि सहकार भारती, मिरा भाईंदर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुभूती – महिला सक्षमीकरण काळाची गरज’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त २३ मार्च रोजी सायं. ३ ते ६ या वेळेत भाईंदर सेकंडरी स्कूल, उत्तन रोड, भाईंदर पश्चिम येथे संपन्न होणार आहे.
(Mumbai news) कार्यक्रमात महिला सक्षमीकरण काळाची गरज (उद्योजकत्वास पोषक शासकीय योजना), डिजिटल मार्केटिंग, दक्षत– ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण व भरीव कामगिरीसाठी महिला संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक मंच (उत्पादन व विपणन) घोषणा देखील केली जाणार आहे.
(Mumbai news) कार्यक्रमाचे उद्घाटन वैशाली आवाडे (महिला प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरद जाधव (संगठन प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) तसेच विशेष निमंत्रित म्हणून भूषण पैठणकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश, विजय जोशी, सचिव, स्वयंसिद्धा फाउंडेशन, डॉ. तेजस्वी शिंदे, पोलीस निरीक्षक, शरद गांगल, बँक प्रकोष्ठ प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष टीजेएसबी बँक, डॉ. आदित्य मानके, संचालक, संजीवनी कॅन्सर हॉस्पिटल, मधुसूदन पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, आशा बिटाने, उद्योजिका, मंगेश पवार, महामंत्री, मुंबई प्रदेश, प्रवीण बुलाख, सहसंगठन प्रमुख, राजू ठाणगे, कोकण विभाग प्रमुख, वीणा मोकाशी, कोकण विभागसह प्रमुख, जया अलीमचांदानी, महिला सहकारी संस्था, महाराष्ट्र प्रदेश, अश्विनी बुलाख, हाउसिंग प्रकोष्ठ प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश, भारती पवार, महिला सहकारी संस्था प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
या भव्य उपक्रमात ५०० हून अधिक महिला उद्योजिकांचा सहभाग अपेक्षित असून, व्यावसायिक संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. महिलांना उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल. महिला उद्योजकांनी आणि इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वयंसिद्धाचे विश्वस्त मानसी जोशी, राजेश पाटील, संचालक मेघना गावडे, आराधी ठाकूर, दत्ताराम वाळवणकर, कल्पना उबाळे तसेच निलेश गोसावी, जिल्हा अध्यक्ष, जयेव वाडकर, जिल्हा महामंत्री, किशोर थिटे, जिल्हा संगठन प्रमुख, चारूशिला शेळके, जिल्हा महिला सह प्रमुख, मीरा खोस, जिल्हा बचत प्रमुख, मयुरी घाडगे, जिल्हा बचत सह प्रमुख, सुजाता सकपाळ, जिल्हा हाऊसिंग प्रमुख आदी परिश्रम घेत आहेत.