Mumbai news | जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अमर हिंद मंडळ विजयी; मुंबई शहर असोसिएशनची मानाची स्पर्धा

महिला कबड्डीसाठी महत्त्वाचा मंच

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | १३ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर

(Mumbai news) मुंबई शहर असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२४-२५ मध्ये अमर हिंद मंडळ संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळाला ५०-४२ अशा रोमांचक फरकाने हरवून अंतिम विजेतेपद पटकावले.

(Mumbai news) या सामन्यात अमर हिंद मंडळ संघाच्या खेळाडूंचा उत्तम खेळ दिसला. शाईशा पेंडणेकर, वेदिका करलोटकर, प्रांजल मोरे आणि मानसी रेडेकर यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षक साईनाथ काळसेकर आणि विजय राणे यांना यशस्वी नेतृत्वासाठी विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने संघाने सर्वोत्तम खेळ सादर केला.
ही स्पर्धा महिला कबड्डीसाठी एक महत्त्वाचा मंच ठरला असून, खेळाडूंच्या मेहनतीचा आणि प्रशिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा परिपाक म्हणून अमर हिंद मंडळाने विजय मिळवला.
सलोनी नाक्ती, मानसी रेडेकर, सौर्या तोडणकर, गार्गी गुरव, अज्ञा तोडणकर, अस्मी पाटील, सौम्या पाटील, रचना कवठनकार, प्रांजल मोरे, वेदिका तिरलोटकर, साईशा पेडणेकर, श्रद्धा कदम यांनी अमर हिंद मंडळ संघाची शान वाढवली.

हे ही वाचा : poem | तुझ्या दाराहून जाता…पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *