Ad imageAd image

Ipl | मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये दाखल; दिल्लीवर 59 धावांनी दणदणीत विजय

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights
  • Ipl 2025

मुंबई | २२ मे | गुरूदत्त वाकदेकर

(Ipl) वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव करत आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. सूर्यकुमार यादवच्या तडाखेबाज अर्धशतकानंतर गोलंदाजीत मिशेल सँटनर आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याने दिल्लीचा डाव १२१ धावांत गुंडाळला.

(Ipl) सूर्यकुमारचा तुफान फटका : नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून माजी कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. मात्र, सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्याने ७ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. शेवटच्या १२ चेंडूंमध्ये सूर्यकुमार व नमन धीरने मिळून ४८ धावा फटकावत स्कोअर १८० वर नेला.

(Ipl) बुमराह-सँटनरची आग ओकत दिल्लीचे स्वप्न भंगलं : प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव सुरुवातीपासूनच ढासळला. संघाचा नियमित कर्णधार अक्षर पटेल अनुपस्थित राहिल्याने फाफ डु प्लेसिसने नेतृत्व केले, पण तो फक्त ६ धावांत बाद झाला. संपूर्ण डावात फक्त समीर रिझवी (३९) याने काहीसा प्रतिकार केला.
बुमराह आणि सँटनरने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत दिल्लीचा डाव १८.२ षटकांत १२१ धावांत संपवला.
महत्त्वाचे Highlights : सूर्यकुमार यादव – ७३ (४३), ७x४, ६x६. नमन धीर – २४ (८), २x४, २x६. जसप्रीत बुमराह – ३ विकेट्स. मिशेल सँटनर – ३ विकेट्स. दिल्लीचा सर्वोच्च स्कोअर: समीर रिझवी – ३९. मुंबईचा विजय फरक: ५९ धावा.
प्लेऑफ समीकरण व पुढील सामने : या विजयामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला. याआधी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ पात्र ठरले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स vs पंजाब किंग्ज – २४ मे, जयपूर.
मुंबई इंडियन्स vs पंजाब किंग्ज – २६ मे, जयपूर.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading