(India news) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची दिल्ली येथे मंगळवारी खासदार शाहू छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि न्यायिक विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.
(India news) काही महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर ते कोल्हापुरात न्यू पॅलेसला आले होते. त्या वेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशज शाहू छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या निवडीबद्दल सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या होत्या.
(India news) त्याच वेळी सरन्यायाधीश गवई यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याचे उद्गार काढले होते. या भेटीनंतर त्यांनी खासदार शाहू छत्रपती यांना दिल्लीला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्ली येथे पुन्हा एकदा ही सदिच्छा भेट पार पडली. या वेळी खासदार शाहू छत्रपती यांनी सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्याची गरज ठामपणे मांडली. त्यांनी न्यायालयीन सुविधांपासून दूर असलेल्या कोल्हापूर व परिसरातील जनतेसाठी हे बेंच किती आवश्यक आहे, यावर जोर देत स्पष्टपणे मांडणी केली.
आपल्या कार्यकाळातच हे बेंच सुरू व्हावे, अशी आग्रही अपेक्षा खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली. या भेटीच्या वेळी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते.