मुंबई | १३ मार्च | गुरूदत्त वाकदेकर
(India news) येथील चव्हाण सेंटरमधे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२४ संपन्न झाला. यंदाचा पुरस्कार गेली ४० वर्ष गडचिरोलीच्या दुर्गम भागात कार्य करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. अनिल काकोडकर, हेमंत टकले, अरुण गुजराथी आदी उपस्थित होते.
(India news) यावेळी शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करताना गडचिरोलीपासून जगभरात आपल्या कर्तृत्वाने त्यांनी पाडलेली छबी ही कौतुकास्पद आहे. त्यांनी सुरु केलेल्या कार्याचा भाग हा नक्षलीपट्ट्यात येतो पण त्यांच्या अनुभवाप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात काम करताना त्यांना कसलाही प्रश्न भेडसावला नाही. याचा अर्थ तिथे बदल घडू लागलाय. हा सगळा परिसर अतिशय देखणा परिसर आहे. अनेक ठिकाणी मी एकेकाळी गेलो. त्याकाळी नक्षल ही समस्या इतकी नव्हती. भामरागड हे महाराष्ट्राचे शेवटचे ठिकाण त्या ठिकाणची स्थिती बघितल्यावर माझ्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात नक्षल हा प्रश्न तयार होऊ लागला होता. माझ्यानंतरच्या काळात मी लक्ष घातले आणि धोरण ठरवलं की हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात भूमिका घ्यावी लागेल पण पिढ्यान् पिढ्या इथल्या आदिवासींना आपण मागास ठेवणार असू, त्यांच्या सुखदुखात समरस होणार नसू तर त्याला चुकीच्या रस्त्यावर प्रोत्साहीत करायला कोणी नक्षली गट प्रयत्न करत असतील तर त्यांना दोष देता येणार नाही. म्हणून हा कायदा व सुव्यवस्था ऐवढ्यापुरता सिमित प्रश्न नाही. याला धरुन एकंदर त्यांच्या विकासासंबंधीचा विचार हा करायला हवा.
(India news) ते पुढे म्हणाले, अलीकडे हे चित्र बदलतय असं दिसत. बंग पतीपत्नी गेली चाळीस वर्ष त्या भागात काम करतायत. त्यांनी निकालच घेतला तो आरोग्य सुधारणेचा. त्या सगळ्या भागामध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत. त्यात आरोग्य सुविधेची कमतरता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा देणं. माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी कसे होईल यावर लक्ष केंद्रीत करणे या सर्व गोष्टींवर या पतीपत्नींनी आपले आयुष्य वाहून दिले. या सगळ्या क्षेत्रात त्यांना केलेल्या कामाची नोंद देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली, आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने घेतली. याचा मला आनंद आहे की त्यांना आपण राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला. विकासासंदर्भात काही नवे प्रश्न हे गडचिरोलीला तयार होत आहे असे त्यांनी मांडले. त्या सर्व भागात स्टिलला उपयुक्त असा कच्चा माल आहे. पण त्याचे दुष्परिणाम आहेत. त्यात मला असे वाटते की राज्य सरकार आणि तिथले स्थानिक नेतृत्व आणि आमच्यासारख्यांनी एकत्र बसून त्यातून मार्ग काढता येईल का हे बघावे. उच्च दर्जाचे लोह हे देशात गरजेचे आहे हे लक्षात घेऊन काही पर्याय निघतो का हे बघावे लागेल. तिथे केवळ विरोधासाठी विरोध किंवा राजकारणासाठी राजकारण ही भूमिका कितपत योग्य होईल याचा विचार करावा लागेल.
बंग यांनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या मुद्यापैकी वाघ आणि त्याचे बछडे त्यांच्या समोरून गेल्याचे सांगितले. हे उदाहरण केवळ गडचिरोलीपूरते सिमित राहीलेली नाही. आज मुंबईतही कधी बातमी वाचायला मिळते की एखाद्या ठिकाणाहून बिबट्या गेला. नाशिकमध्ये कोणाच्या घरात बिबट्या शिरला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक वाघ हे महाराष्ट्रात आहेत अशी आकडेवारी समोर आली. याचा अर्थ तुम्ही आम्ही लोकांनी या वन्यप्राण्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी हस्तक्षेप केला. जंगल तोडल्याने वाघांच्या, बिबट्याच्या राहाण्याची ठिकाणी आम्ही शिरलो. त्याचा परिणाम हा होतोय. त्यावरही बसून विचार करावा लागेल.
शरद पवार म्हणाले, आज बंग पतीपत्नीची या पुरस्काराकरीता निवड झाली. यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हा पुरस्कार आहे. एक दृष्टी असलेले नेतृत्त्व म्हणून आपण चव्हाण साहेबांना ऐकतो. संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल याचा शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला. म्हणून महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारे, एक सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या नावाने हा पुरस्कार गेले काही वर्ष आपण सुरु केला. तो योग्य लोकांनाच मिळेल याची काळजी आपण घेतो. त्याचे महत्त्वाचे कारण या पुरस्कारात व्यक्तींची निवड करण्याचा अधिकार हा डॉ. काकोडकर आणि त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांना आहे. त्यात आमचा संबंध नाही. त्यामुळे बंग पतीपत्नी यांची निवड याठिकाणी होऊ शकली याचे मला मनापासूनचे समाधान आहे.
डॉ. बंग यांनी गडचिरोली या भागातील एकंदर स्थिती लोकांसमोर मांडली. तिथे परिवर्तन करण्यासाठी कशी पावले टाकावी यासंबंधीचे विचार ठेवले. याबद्दल त्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.