वर्धा | ६ एप्रिल | समता विकास
(india news) जिल्ह्यातील देवळी येथील राममंदिरात ही घटना घडली आहे. सतत देव देव करणारे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राममूर्तीच्या पूजेपासून पुजाऱ्याने रोखले. देवळीतील राम मंदिरात हा अत्यंत अपमानास्पद अनुभव रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना रामनवमीच्या दिवशी आला. यावेळी अनेक भाजपचे पदाधिकारीही त्यांच्यासोबत होते. मात्र त्यांच्यासह तडस यांना पुजाऱ्याला सुनावण्याचे धाडस काही झाले नाही. पुजाऱ्याने तडस यांना आणि त्यांच्या पत्नीला गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखल्यावर त्यांनी गाभारा सोडला आणि कठड्याच्या बाहेर येऊन दर्शन घेतले. पूजेचे ताट त्यांच्या हातातच राहिले. राममूर्तीवर त्यांना फुलेही वाहता आली नाहीत.
(india news) या घटनेनंतर बोलताना तडस म्हणाले, मला निश्चितच वाईट वाटले. या मंदिरात विविध सुधारणा करण्यास मी व गावकऱ्यांनी वेळोवेळी मदत केली. हे पुजारी महोदय कुटुंब पिढीजात आहे. सध्या ते पुणे येथे स्थायिक असून केवळ रामनवमीला देवळी येथे येतात. त्यांनी सोवळंओवळे काय लावले आहे. एक दिवसासाठी पुजारी येतात आणि नियम सांगतात, हे योग्य नाही. पण पुजारी आडूनच बसला होता, म्हणून मी वाद टाळला.
(india news) विशेष म्हणजे या गावातील मंदिरात महात्मा गांधी ज्यांना देवाची माणसं म्हणजे हरिजन म्हणत त्यांच्यासाठी मंदिर खुले व्हावे म्हणून महात्मा गांधी यांनी पुढाकार घेत मंदिर सर्वांसाठी खुले केले होते. तिथेच असे घटना झाल्यानंतर आता गावकरी संताप व्यक्त करत आहेत.
हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक