ग्रंथपरिचय
पुणे | २१ सप्टेंबर | रयत समाचार
(India news) देशाचा अर्थसंकल्प हा फक्त एका वर्षापुरता मर्यादित दस्तऐवज नसून तो आगामी आर्थिक धोरणांची दिशा आणि अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट करणारा आराखडा असतो. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे अर्थसंकल्पीय चर्चेत तात्कालिक मुद्द्यांवरच भर दिला जातो आणि धोरणांच्या सातत्य वा बदलांचा सखोल आढावा घेतला जात नाही, अशी माहिती संपादक निरज हातेकर यांनी दिली.
(India news) याच पार्श्वभूमीवर युनिक फाऊंडेशनतर्फे अर्थसंकल्पावर आधारित एक महत्त्वपूर्ण पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. ‘विकसित भारत आणि अर्थसंकल्प २०२५-२६’ असे या पुस्तकेचे नाव आहे. या मालिकेतील ही पहिली पुस्तिका असून, नामवंत लेखकांनी अर्थसंकल्पातील धोरणात्मक चौकट, त्याची दिशा तसेच सातत्य वा बदल यांचा विश्लेषणात्मक ऊहापोह केलेला आहे.
(India news) ही पुस्तिका अर्थसंकल्प समजून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासक, विद्यार्थी, पत्रकार तसेच धोरणनिर्यात्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. पुढच्या वर्षापासून दरवर्षी अशा स्वरूपातील पुस्तिका प्रकाशित करण्याचा संकल्प फाऊंडेशनने व्यक्त केला असून, अभ्यासक व वाचकांसाठी ही मालिका उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
पुस्तिकेसाठी संपर्क :
+91 99226 08687.
मूल्य : फक्त 120/- रूपये.