मुंबई | १९ जानेवारी | गुरुदत्त वाकदेकर
(india news) महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले.

(india news) उर्वरित जिल्ह्यांचे पालकमंत्री व सहपालकमंत्री –
नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील
वाशीम : हसन मुश्रीफ
सांगली : चंद्रकांत पाटील
नाशिक : गिरीश महाजन
पालघर : गणेश नाईक
जळगाव : गुलाबराव पाटील
यवतमाळ : संजय राठोड
मुंबई उपनगर : ॲड. आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी : उदय सामंत
धुळे : जयकुमार रावल
जालना : श्रीमती पंकजा मुंडे
नांदेड : अतुल सावे
चंद्रपूर : डॉ.अशोक उईके
सातारा : शंभूराज देसाई
रायगड : कु. आदिती तटकरे
लातूर : शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार : ॲड. माणिकराव कोकाटे
सोलापूर : जयकुमार गोरे
हिंगोली : नरहरी झिरवाळ
भंडारा : संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट
धाराशिव : प्रताप सरनाईक
बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग : नितेश राणे
अकोला : आकाश फुंडकर
गोंदिया : बाबासाहेब पाटील
कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री : श्रीमती माधुरी मिसाळ
वर्धा : डॉ. पंकज भोयर
परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर
हे ही वाचा : india news: हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? सत्येंद्र पीएस संपादित सनातन धर्माचा आयुर्वेद मांसाहार संदर्भ असलेला 1 ‘औषधी ग्रंथ’ : मांसौषधि
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.