मुंबई | रयत समाचार
(India news) भारत सरकारने २०२७ मध्ये राष्ट्रीय जनगणना घेण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून, या जनगणनेची पूर्वचाचणी (Pre-Test) देशभरात १० ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार. महाराष्ट्रासह सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या चाचणीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
(India news) जनगणना संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई यांच्या माहितीनुसार, ही जनगणना दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक आपल्या वाटप केलेल्या क्षेत्रातील प्रत्येक घर व कुटुंबाला भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील.
(India news) संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनतेला आवाहन केले की, जनगणनेकरिता नियुक्त अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे आणि दिलेली माहिती अचूकपणे उपलब्ध करून द्यावी. ही प्रक्रिया देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे शासन विविध सामाजिक, आर्थिक व विकासविषयक योजना आखते. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेत जबाबदार सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
