वरळी | ५ जुलै | प्रतिनिधी
(India news) मुंबई येथे भव्य मराठी भाषा विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मराठी भाषेप्रती प्रेम असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
(India news) या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. दोन्ही नेत्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या जतनासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
(India news) मेळाव्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी पक्षाच्या वतीने विशेष उपस्थिती लावली. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड डॉ. अजित नवले, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, , भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशनचे कॉम्रेड उदय भट, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि अमित ठाकरे यांचाही उपस्थितीमध्ये समावेश होता.
मेळाव्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच विविध राजकीय आणि सामाजिक विचारधारांचे नेते एका मंचावर येऊन भाषेच्या प्रश्नावर एकवटल्याचे पाहायला मिळाले.
