India news | मशिदीत ब्लास्ट करणाऱ्या दहशतवाद्यांवर UAPA / NSA अंतर्गत कठोर कारवाई करावी- फैय्याज इनामदार; अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करू

उपसंपादक | दिपक शिरसाठ

बीड |३० मार्च | प्रतिनिधी

(India news) (beed blast) गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मस्जिदमध्ये जिलेटीनने ब्लास्ट करून मस्जिद उडवण्याचा प्रयत्न केला. तलवाडा पोलिसांनी कारवाई करून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहे. हे दहशतवादी कृत्य अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे, असे संतापजनक उद्गार फैयाज इनामदार यांनी काढले.

(India news) अधिक माहिती देताना इनामदार यांनी सांगितले, २९ तारखेला रात्री गावात संदल असताना आरोपी विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे हे संदलीमध्ये मुस्लीम समाजाचे लोकांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करून तुमचे येथे काय काम आहे असे म्हणुन शिवीगाळ करीत होते आणि म्हणत होते की, इथे मस्जिद कशाला बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू. यावेळी गावातील सरपंच व इतर नागरिकांनी त्यांची समजूत काढून परत पाठवले. ३० तारखेच्या पहाटे त्यांनी मशिदीत ब्लास्ट घडवून आणला. ही घटना Unlawful Activities (Prevention) Act. (UAPA) मधे बसत नाही का? हा terorist अटॅक असल्याने प्रशासनाने स्वतः फिर्यादी होणे गरजेचे होते, पण यात प्रशासनाने का फिर्याद दाखल केली नव्हती? असा खडा सवाल इनामदार यांनी विचारला आहे.India news

(India news) फैयाज इनामदार यांनी मागणी केली आहे की, पोलिसांनी दहशतवाद्यांकडे स्फोटक साहित्य कुठून आले याची चौकशी करून या घटनेमागे अजुन कोण आहेत हे समोर आणले पाहिजे ? २९ तारखेला जे झाले त्याची कल्पना स्थानिक पोलिसांना नव्हती का? जर होती तर ही घटना कशी घडली? अजुनही UAPA, NSA कायद्यांतर्गत गुन्हा का दाखल केला नाही ? तो लवकरात लवकर करावा. दहशतवाद्यांचे नार्को टेस्ट करून हे संघटित गुन्हेगारीसारखे प्रकरण आहे का याची चौकशी करावी. आरोपी कोणत्या संघटनेशी निगडीत आहे हे पहावे.
मागे घटसावळीत पण अशीच घटना घडली होती नंतर या प्रकरणात काय झाले सर्वांना माहीत आहे. बीड पोलिसांनी या दहशतवाद्यांना कठोर कारवाई करून यांच्यावर UAPA / NSA अंतर्गत कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने याविरोधात जनआंदोलन करू असा इशारा इनामदार यांनी दिला.

हे ही वाचा : ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *