(History) शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शालेय वयातील विद्यार्थ्यांसाठी ‘असे होते आपले शाहू महाराज’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ता.२६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
(History) ग्रंथलेखनाची जबाबदारी विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या १४४ पानी या ग्रंथात शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक पैलूंना शालेय विद्यार्थ्यांच्या भाषेत सहजसोप्या आणि रेखाटनेसह उलगडले आहे. अन्वर हुसेन यांच्या ४५ रेखाटनांनी समृद्ध असलेले हे पुस्तक केवळ रु. ५०/- या किमतीत उपलब्ध होणार आहे.
(History) प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के असतील, तर ग्रंथाचे प्रकाशन डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ. पी.एस. पाटील (कुलसचिव), तसेच डॉ. व्ही.एन. शिंदे आणि डॉ.अनुराधा पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
ग्रंथाची इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती अनुवादित आवृत्तीदेखील लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या वतीने हा सोहळा खुला असून, विद्यार्थ्यांसह शिक्षक, अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.