पुणे | रयत समाचार
(History) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सहकार्याने आयोजित जागतिक व भारतीय मध्ययुगीन इतिहास विषयक नोंद लेखन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
(History) इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बाबासाहेब दूधभाते, डॉ. देवकुमार अहिरे, डॉ. मगर, प्रा. दीपाली गायकवाड, बापूराव घुंगरगावकर आणि इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे ही कार्यशाळा यशस्वी ठरली, अशी माहिती प्रेम हनवते यांनी दिली.
(History) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील विद्याव्यासंगी सहाय्यक सरोजकुमार मिठारी, डॉ. पद्माकर प्रभुणे, डॉ. पठारे आणि गिरीश मांडके यांसारख्या तज्ज्ञांनी कार्यशाळेत सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राज्यभरातून ३५० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ७० संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी यांची निवड करण्यात आली होती.
इतिहास अभ्यासकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली असून भविष्यातील इतिहास लेखनासाठी दिशा देणारी असल्याचे सहभागी अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले.
