पुणे | २७.१० | रयत समाचार
(History) दख्खनच्या इतिहासाचा गाभा समजून घ्यायचा असेल तर यादवकालीन नाण्यांच्या अभ्यासाला पर्याय नाही, असे मत मांडणारे सुप्रसिद्ध नाणाशास्त्रज्ञ डॉ. शैलेन भांडारे यांचे व्याख्यान येत्या बुधवारी ता. २९ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
(History) कार्यक्रमाचे ठिकाण इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे असून, वेळ दुपारी ३ ते ५ अशी आहे. या व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी केले.
(History) हे व्याख्यान ‘यादवकालीन दख्खन – नाणकशास्त्रीय सर्वेक्षण’ या विषयावर असून विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्र (मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रे) व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ब्रह्मानंद देशपांडे स्मृती व्याख्यानमालेचा’ हा कार्यक्रम आहे.
डॉ. भांडारे हे सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील ॲशमोलियन संग्रहालयाचे वरिष्ठ वस्तुपाल म्हणून कार्यरत असून, भारतीय नाणकशास्त्र आणि दख्खन इतिहासावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व्याख्यानमालेत नव्या संशोधनदृष्टीचा समावेश होणार असल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा ! – संजीव चांदोरकर
