राजर्षी शाहू महाराज यांच्या राजदरबारामध्ये ‘मिठाराणीचे वगनाट्य’ सादर केले पवळा भालेराव व पठ्ठे बापूराव यांनी
संगमनेर | २८ जानेवारी | प्रतिनिधी
(history) १९ व्या शतकात तमाशा क्षेत्रामध्ये प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर या होय. त्याकाळात पुरुषप्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेचा पगडा होता. सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती, आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून नामचंद पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले. त्यांनी पठ्ठे बापूराव बरोबर महाराष्ट्रभर सर्वत्र वगनाट्ये, लावण्या सादर केल्या. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर राजदरबारामध्ये ‘मिठाराणीचे वगनाट्य’ पवळा भालेराव व पठ्ठे बापूराव यांनी सादर केले.
(history) महाराष्ट्र शासनाने सन २०२२ मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्काराला त्यांचे नाव देऊन सन्मान केला. अशा कलेच्या महान सम्राज्ञी आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्याचे मागणी कलासम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नामचंद पवळा यांच्या जन्मगावी ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी प्रजासत्ताक दिनी मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करण्याची मागणी कला सम्राज्ञी पवळा कला मंचच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारस करण्याची मागणी करणारा ठराव सामाजिक कार्यकर्ते भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी ग्रामसभेत मांडला. हा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांनी पवळा भालेराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.
पवळा भालेराव हिवरगावकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास हिवरगाव पावसा तसेच संगमनेर तालुका तसेच अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाशा लोककलेच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला जाणार आहे. कलेच्या महान सम्राज्ञीचा उचित व योग्य सन्मान भारत सरकार यांच्याकडून झाल्यास लोककला क्षेत्रासाठी एक सुवर्णक्षण ठरेल, अशी भावना हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामसभेस अध्यक्ष सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. विजय पावसे, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे, ग्रामसेवक हरिष गडाख, केशव दवंगे, पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
हिवरगाव पावसा ग्रामपंचायतने मंजूर केलेल्या ऐतिहासिक ठरावाबद्दल ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, वृक्षमित्र गणपत पावसे, रघुनाथ भालेराव, अरुण खरात, राजेश गायकवाड, पत्रकार महेश भोसले, पुरवठा निरीक्षक संदीप निळे, डी.के. गायकवाड, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे, सोमनाथ भालेराव, बाळासाहेब भालेराव, बच्चन भालेराव, संजय भालेराव, मन्सूर इनामदार, कैलास दिवटे, के.एस. गायकवाड, अशोक भालेराव, रंजना भालेराव, सुयोग भालेराव, अभिजीत भालेराव, शैला भालेराव, रोहिणी भालेराव, हितेन संगरे, लहानु भालेराव, सत्यजित भालेराव, राजू दारोळे, बाबासाहेब कदम, विलास कदम, भाऊसाहेब निळे, विजय निळे, दिलीप चाबुकस्वार, सूचक चाबुकस्वार, गुलाब भालेराव, राजू भालेराव, राजेंद्र भालेराव, संजय डहाणे, भाऊसाहेब बोऱ्हाडे, यादव भालेराव, प्रा.छबन मुंतोडे, अर्जुन मुंतोडे, सुनील मुंतोडे, संतोष भालेराव, बाबासाहेब भालेराव, दिपक भालेराव, समाधान भालेराव, नारायण मोकळ, विकास दारोळे आदींसह हिवरगाव पावसा ग्रामस्थ, कलाप्रेमी नागरिक यांनी ग्रामपंचायतचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.