आरोग्यवार्ता | संतोष सरसमकर, जामखेड
Happy Hormones आनंद मिळविण्यासाठी मानवी शरीराला उपयुक्त असलेले चार हार्मोन्स. नैराश्य, चिंता, मूड डीसऑर्डर्स, झोपेच्या समस्या, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, आत्मघातकी वर्तन, फोबिया अशा शारीरिक मानसिक विकारांपासून जर दूर जायचे असेल तर; तुम्ही हा लेख आनंदाने वाचा.
१) डोपामाईन – ‘फील गुड’ हार्मोन म्हणून ओळखले जाणारे हे हार्मोन्स मनाला आनंदाची अनुभूती व प्रेरणा नेहमीच देत असते. तुम्ही एखाद्याचे कौतुक केले तर डोपामाईनची मात्रा वाढणार आहे आणि एखाद्यावर जर तुम्ही जळालात तर डोपामाईनची मात्रा तितक्याच वेगाने कमी देखील होणार आहे. खाणे- पिणे, जगण्यासाठी स्पर्धा करणे आणि पुनरुत्पादन करणे या जगण्यासाठी आवश्यक क्रिया करताना आनंद वाटावा म्हणून मेंदूमधून मोठ्या प्रमाणात डोपामाईन श्रवू लागते.
डोपामाईनचे संतुलन योग्य प्रमाणात असल्यास आनंदी वृत्ती, काही चांगले करण्याची प्रेरणा निर्माण होत राहते. आजूबाजूच्या घडामोडींबाबत सावधपणा येतो आणि इच्छित कामावर लक्ष केंद्रित राहते; परंतु डोपामाईनची पातळी कमी झाल्यास थकल्याची भावना, परिणामांची भीती न वाटणारा बिनधास्तपणा किंवा स्मृतीभ्रंश, लहरी स्वभाव, झोप नीट न लागणे, एकाग्रता न होणे हे विकार उद्भवू शकतात. याउलट डोपामाईनची पातळी जास्त असेल तर सळसळणारा उत्साह, उत्स्फूर्तता दिसून येतो.
२) ऑक्सिटॉसिन – ऑक्सिटॉसीन हार्मोनची भूमिका ही वर्तणुकीमध्ये सकारात्मक विचार आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करणे, एखाद्यावर विश्वास ठेवणे, आईवडिलांबरोबर घट्ट नाते निर्माण व्हावेत अशा भावनांचा आनंददायी समावेश असतो.
३) एंडॉर्फिन – हा हार्मोन शरीराला वेदना किंवा तणाव जाणवल्यावर श्रवू लागतो. व्यायाम, मसाज, खाणे अशा आनंददायी क्रियांदरम्यान तो नेहमीच स्रवतो. वेदना आणि तणाव कमी करण्यास आणि मनातील आरोग्य भावना सुधारण्यास हा हार्मोन्स मदत करतो. एंडॉर्फिन योग्य प्रमाणात श्रवल्यामुळे भूक नियंत्रित केली जाते आणि आपोआप वजन देखील नियंत्रित राहते.
४) सेरोटोनिन – सेरोटोनिन शरीरात अनेक चांगल्या भूमिका बजावते. शिकणे, स्मरणशक्ती, आनंद, बॉडी टेंपरेचर, झोप, लैंगिक वर्तन आणि भूक यांचे विशिष्ट नियमन नेहमीच करत असते. सेरोटोनीनची कमतरता नैराश्य, चिंता वाढविते.
आनंदाचे डोह असलेले हार्मोन्स वाढविण्यासाठी काही उपाय – मनाचा मूड चांगला राहण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या खाण्यातून दूध, सूर्यफुलाच्या बिया, भिजलेले शेंगदाणे, (कच्चे शेंगदाणे बिलकुल नाही अगदी भाजीतील कूट सुद्धा मान्य नाही.) भोपळ्याच्या बिया, अननस, ओट्स, अंड्याचा पांढरा भाग, सूर्यप्रकाशात राहणे अथवा सकाळचे कोवळे ऊन उघड्या अंगावर घेणे, हवा-पाणी-माती-अग्नी-नियमित व्यायाम यांचा मुबलक व प्राकृतिक चिकित्सेचा वापरच मानवाला वाचविणार आहे.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.