हरमल | २९ डिसेंबर |प्रभाकर ढगे
(Goa News) गोव्याच्या वास्को वायपर्स संघाने कोईम्बतूर, तामिलनाडू येथील युवा कबड्डी सिरीजच्या ११ व्या एडिशनमधील तृतीय विभागीय गटाचे विजेतेपद पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली वास्को वाईपर्स संघाने अंतिम सामन्यात हिमालायन ताहर्स संघाचा ३४ – ३० अशा गुण फरकाने पराभव करत विभागीय चषकाचे जेतेपद पटकावले.
(Goa News) करपागम विद्यापीठ संकुलात १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा सुरु होती. प्रारंभीक फेरीत वास्को वायपर्स संघाने ताडोबा टायगर्स, इंदोर इन्व्हिसीबल, कोणार्क किंग्स, डेहराडून डायनामोस, रांची रेंन्जर्स, लडाख ओल्वस, चम्बल चॅलेंजर या संघाना पराभूत करीत अंतिम फेरी गाठली.
अटीतटीच्या अंतिम सामन्यात वास्को वायपर्सच्या प्रिन्स दहियाने १० रेड गुण मिळवल्याबद्दल त्याला सामन्याचा तसेच मालिकेचा उत्कृष्ट रेडर म्हणून गौरविण्यात आले. वास्कोच्या सचिनला उत्कृष्ट डिफेन्डर म्हणून पारितोषिक देण्यात आले.
वास्कोचा कर्णधार भार्गव मांद्रेकर याने संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी बाजावीत ९ सामन्यात ४४ रेड पॉईंट्सची कामाई केली.

तृतीय विभागात ताडोबा तायगर्स आणि हिमालयन ताहर्स संघाना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्यांदाच युवा कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या वास्को वायपर्स संघाने आपल्या पदार्पणतच धुरंधर संघाना धूळ चारत स्पर्धेत विशेष थाप उमटवली त्याबद्दल गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्षा रुक्मिणी कामत, बाबू कामत यांनी अभिनंदन केले आहे.
सध्या द्वितीय व प्रथम विभागीय सामने खेळले जात असून या स्पर्धेतील उत्कृष्ट संघ २५ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या युवा कब्बडी एडिशन ११ च्या अंतिम लीग स्पर्धेत खेळणार आहेत.
भार्गव मांद्रेकर : कबड्डी विश्वातील उभरता तारा
कबड्डी विश्वातील उभरता युवा तारा म्हणून ओळखला जाणारा गोवा वास्को वाईपर्स संघाचा कर्णधार भार्गव मांद्रेकर यांनी २०२३ मध्ये मधुराई, तामिळनाडू येथे झालेल्या युवा कबड्डी सिरीजमध्ये मराठा मारवल्स संघातर्फे पदार्पण केले होते. त्यात त्याने १० सामन्यात ६४ रेड पॉईंट्सची कमाई केलेली. त्यानंतर २०२३ मध्ये गोव्याच्या राष्ट्रीय कनिष्ठ कबड्डी संघांचेही भार्गवने नेतृत्व करीत कांस्य पदक पटकवले आहे. गोवा वरिष्ठ कबड्डी संघासाठीही तो खेळतो. रायगड, महाराष्ट्र येथील मीड लाईन कबड्डी अकादमीत गेली तीन वर्षे तो प्रशिक्षण घेत आहे. शालेय स्थरापासून भार्गवने कबड्डीच्या मैदानावर विशेष चमक दाखवत आज युवा कबड्डी सिरीज जिंकण्यापर्यंत मारलेली मजल अत्यंत स्पृहाणीय असल्याने गोवा तसेच राष्ट्रीय स्थरावर त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.