राहुरी | मनोज हासे, दत्ता जोगदंड
Election News राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज सोमवारी ता.२८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खा. निलेश लंके उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
Election News अधिक माहिती देताना तनपुरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी मी अविरतपणे काम केले. विकासाची ही घोडदौड अखंड सुरु रहावी यासाठी माझ्या मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा मला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून संधी देईल हा विश्वास आहे. आपणा सर्वांच्या साथीने हे सहज शक्य होईल.
ते पुढे म्हणाले, माझी सर्वांना नम्र विनंती आहे की विकासाचे पर्व अखंड सुरु रहावे यासाठी आपण सर्वांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी येथे अवश्य उपस्थित राहावे. Election News
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.