अहमदनगर | २०.११ | रयत समाचार
(Election) अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकूण ३,००,७०० मतदारांचा समावेश आहे. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीची विभागणी करून प्रभागनिहाय यादी तयार करण्यात आली, असल्याची माहिती प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
(Election) प्रभागनिहाय मतदारसंख्येत मोठी तफावत दिसून येते. प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक २२,४९५ मतदार असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वांत कमी १४,८३० मतदार नोंदले गेले आहेत. प्रभाग क्रमांक १ ते १७ या सर्व प्रभागांची मतदारयादी स्वतंत्ररित्या छापण्यात आली आहे.

(Election) महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी आपल्या नावाची नोंद झाली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. मतदारांनी https://amc.gov.in/election/ या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव शोधून खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
