Election: विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

70 / 100 SEO Score

अहमदनगर | २१ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Election विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी ता.२३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक हौलिनलाल गौईटे (संपर्क अधिकारी – उर्ध्व प्रवरा उपविभाग कार्यकारी अभियंता प्रदिप हापसे – ७३५००७८८७७). संगमनेरसाठी सुनिल सिंग (संपर्क अधिकारी – उर्ध्व प्रवरा उपविभाग कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे – ९४०४०७३७३९). शिर्डीसाठी कविथा रामू (संपर्क अधिकारी – सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे – ७२१८४८०३२२). कोपरगावसाठी शेरी (संपर्क अधिकारी – रचना सहायक किरण जोशी – ९८५०१७८७९५). श्रीरामपूरसाठी अरूण कुमार (संपर्क अधिकारी – मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलम – ८४२५९२४४३३) आणि नेवासा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जे.एल.बी.हरि प्रिया (संपर्क अधिकारी – विस्तार अधिकारी बी.के.कासार – ७७७४०४७९७९) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीमती रंजिता (संपर्क अधिकारी – मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील व धनश्री शिंदे- ९७६४५६४४५५).  राहूरीसाठी केशव हिंगोनिया (संपर्क अधिकारी – सहायक प्राध्यापक आर.आर.निरगुडे – ७५८८६०४१५१). पारनेरसाठी सुरेंदर सिंग (संपर्क अधिकारी –कुकडी पाटबंधारे श्री.घोरपडे – ९२२५५४४३३१). अहमदनगर शहरसाठी ताय काये (संपर्क अधिकारी – सहायक अभियंता संदिप कुंभार – ९५५२१३४७८५). श्रीगोंदासाठी डी. रथ्ना (संपर्क अधिकारी सहायक गटविकास अधिकारी विजय गायकवाड – ९०११८४५५२९, उपविभागीय अभियंता बबन वाळके – ९४२२३३५५१२, पुरवठा निरीक्षक – ८७८८४२०८५६) आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून पुजा यादव (संपर्क अधिकारी – मुख्याधिकारी अजय साळवे – ८४८३८४८५३७, पुरवठा निरीक्षक वृषाली जाधव- ७३८७४०६९७२) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निरीक्षक समन्वयक अधिकारी दीपक दातीर यांनी दिली आहे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *