अहमदनगर | ८ नोव्हेंबर | प्रतिनिधी
आगामी Election च्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भिंगार भागातील प्रत्येक कुटुंबातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना “विजयी भव:” आशीर्वाद दिला. औक्षणातून कळमकर यांना महिलांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले, ज्यामुळे प्रचारफेरीत उत्साह वाढला.
प्रचार दौऱ्यातील संवादादरम्यान कळमकर यांनी नागरिकांना होणाऱ्या अडचणींविषयी सविस्तर माहिती घेतली. पाणीपुरवठ्यातील अडचणी, निकृष्ट रस्ते, अपुरी कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, वीजपुरवठा तसेच मूलभूत सुविधांची कमतरता यासारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासने मिळाली आहेत, परंतु या समस्या कायम तशाच राहिल्या आहेत, असे अनेकांनी सांगितले.
अभिषेक कळमकर यांनी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. शब्द नव्हे, वचन देतो की, भिंगार परिसरातील विकासासाठी आपली संपूर्ण ताकद लावणार आहे. या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे ठोस प्रयत्न मी करीन, असा ठाम विश्वास कळमकर यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी कळमकर यांच्या या आश्वासनावर पूर्ण विश्वास दाखवला. “आमच्या भागातील समस्यांवर सोडवणूक करण्यासाठी आम्ही यंदा अभिषेक कळमकर यांना पूर्ण पाठिंबा देऊ,” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मित्र मंडळाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामुळे प्रचार फेरीला विशेष उर्जितावस्था लाभली. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळणारच, असा आत्मविश्वास कळमकरांनी व्यक्त केला. या भागाच्या विकासासाठी संकल्पबद्ध असल्याचे सांगितले.
“शब्द नव्हे, वचन” या भावनेतून काम करण्याचा संकल्प घेतलेल्या अभिषेक कळमकर यांनी भिंगार परिसराच्या विकासासाठी आपली सर्वतोपरी मेहनत करणार असल्याचे नागरिकांना आश्वस्त केले.
हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा
Contents
अहमदनगर | ८ नोव्हेंबर | प्रतिनिधीआगामी Election च्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भिंगार भागातील प्रत्येक कुटुंबातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना “विजयी भव:” आशीर्वाद दिला. औक्षणातून कळमकर यांना महिलांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले, ज्यामुळे प्रचारफेरीत उत्साह वाढला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.