Election: मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके कोपरगांव शहरात मतदार जनजागृतीच्या उपक्रमांचे आयोजन

58 / 100 SEO Score

शिर्डी | किसन पवार

 

Election कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी केले आहे.

 

कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने कोपरगाव शहरातील विविध शाळा, सामाजिक संस्था यांचा सहभाग घेऊन मतदार जनजागृतींच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, स्वच्छतादूत सुशांत घोडके आदी उपस्थित होते.

 

कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांची जागृती करणारे गीत ऐकवणारा रथ, हातामध्ये जनजागृती फलक घेतलेले शालेय विद्यार्थी मतदारांची लक्ष वेधून घेत होते. फेरीची सांगता तहसील कार्यालय प्रांगणात करण्यात आली. येथे गायिका गौरी पगारे हिने मतदारांना जनजागृती गीताद्वारे जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

 

डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटिका सादर केली. तसेच मतदार जागृतीचा पोवाडा सादर केला. याप्रसंगी मतदानाची शपथ देण्यात आली.

 

मतदार जनजागृती फेरीत केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा) आणि भारत निवडणूक आयोग यांचा मतदार जागृती चलचित्र रथ, एस.जी. विद्यालय, डॉ.सी.एम. मेहता विद्यालय, विद्या प्रबोधिनी शाळा, न.पा. शिक्षण मंडळ शाळा क्र. ६, एम.के.आढाव विद्यालय, मौलाना मुनीर उर्दू हायस्कूल, एस.एस.जी.एम. काॅलेजचे विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक तसेच कोपरगांव नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी कोपरगाव शहरातील गावठाण भागात स्वतंत्र जनजागृती फेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *