नवी मुंबई | ८ मार्च | सोपान आडसरे
(Education) शिक्षणासाठी दररोज लांब पल्ला पार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी We Club of Vashi Navi Mumbai आणि मैत्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका वावरले न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत २० सायकली, १२ छताचे पंखे व २ टेबल फॅन भेट दिले.
(Education) या उपक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे मोहन केशव तसेच सामाजिक कार्यकर्ते जगे काका यांचे विशेष सहकार्य लाभले. जगे काका यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना मोफत व उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे असंख्य विद्यार्थी आज मोठमोठ्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकले. जगे काका हे नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या कार्यात अनेक शिक्षकवृंद सातत्याने सहकार्य करत आहे.
(Education) या सामाजिक कार्यामध्ये पाटील सी.जी. (प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, डोळखांब), पवार एम.आर. (उपशिक्षक), भेरे पी.बी. (उपशिक्षक) आणि गोरडे एस.पी. (उपशिक्षक) यांचे देखील मोठे योगदान असून, ते जगे काकांच्या उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेतात. या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश लक्ष्मण प्रक्षाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकवृंदांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. प्रक्षाळे सरांनी “विद्यार्थ्यांच्या जीवनात या उपक्रमामुळे मोठा सकारात्मक बदल घडेल,” असे मत व्यक्त करत दोन्ही संस्थांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलगे मॅडम यांनी, आभार प्रदर्शन पवार मॅडम यांनी तर दरेकर सर यांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.