श्रीरामपूर | १५ एप्रिल | प्रतिनिधी
(Education) रयत शिक्षण संस्थेच्या आर.बी. नारायण बोरावके कॉलेज येथे संस्थेच्या उत्तर विभागातील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता मास्टर ट्रेनिंग’ प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ आज ता.१५ रोजी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Retd.) यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमााच्या अध्यक्षस्थानी मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने होत्या.
(Education) यावेळी दळवी म्हणाले, एकविसावे शतक हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे आणि म्हणून रयत शिक्षण संस्था बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रत्येक शाळा साधनसामुग्रीने अद्यावत केली आहे. जून महिन्यापासून प्रत्येक शाखा इंटरॅक्टिव्ह पॅनलने समृद्ध असेल खडू आणि फळा याऐवजी व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड व इंटरॅक्टिव्ह पॅनलचा उपयोग केला जाईल.
(Education) रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १३ धोरणात्मक विषयावर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून सर्व साडेसातशे शाखांमध्ये ‘एआय‘ हा विषय सुरू करणार व विद्यार्थ्यांना समृद्ध करणार असल्याची माहिती चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी दिली.
एआय, मशीन लर्निंग, कोडींग, रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंग या विषयांचा समावेश असणार आहे. यावेळी उत्तर विभागाने रयत शिक्षण संस्थेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गुणवत्ता कक्षाच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांनी ‘एआय’ चे सध्याच्या जीवनातील महत्त्व विशद केले.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.