मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

Education | प्रो. सय्यद मुदस्सर नजीर यांना पीएचडी प्रदान; ‘फॅमिली-ओन्ड एंटरप्रायजेसमधील सक्सेशन प्लॅनिंग’ विषयावर महत्वाचे संशोधन 

Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर | १८ सप्टेंबर | तुषार सोनवणे

येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च मधील सहायक प्राध्यापक सय्यद मूदस्सर नजीर यांना आज ता.१८ रोजी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी An Analytical Study on Succession Planning in Family-Owned Enterprises in Ahmednagar District या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले. हे संशोधन कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी अंतर्गत ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट विषयाशी संबंधित आहे.

 

संशोधनास प्रमुख मार्गदर्शन डॉ. प्रनोती तेलोरे यांनी केले. संस्था संचालक डॉ. एम.बी. मेहता, उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस यांचे मार्गदर्शनासह साथ लाभली तसेच सय्यद कुटुंबीय पत्नी राहीला, मुलगी मरयम आणि मुलगा याह्या, बंधु ज़हिर यांचे सहकार्य लाभले.

 

या संशोधनातून अहमदनगर जिल्ह्यातील कौटुंबिक उद्योग-व्यवसायांमध्ये उत्तराधिकार नियोजनाची सखोल मांडणी व विश्लेषण करण्यात आले असून, स्थानिक उद्योगजगतासाठी हे निष्कर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now