अहमदनगर | २७ जानेवारी | राहुल जाधव
(education) येथील सी.डी.देशमुख लॉ कॉलेजमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सचिव प्रा.ना.म. साठे होते तर प्रमुख अतिथी मेजर नीळकंठ उल्हारे, सुभेदार रघुनाथ दांगट, मेजर बाजीराव दरेकर उपस्थित होते. सकाळी आठ वाजता पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रमुख अतिथी यांनी सैनिक म्हणुन देशाची सेवा केल्याबद्दल शुर सैनिक मानपत्र देऊन सन्मान केला.
(education) यावेळी निवृत्त सेनानी नीळकंठ उल्हारे यांनी प्रतिपादन केले की, सर्वस्वाचा त्याग करून क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र केला. या स्वतंत्र भारताचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैनिक जीवाची पर्वा न करता करतात म्हणुन सैनिकांबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर आहे. प्रमूख अतिथी सैनिक आपल्या मनोगतातून युद्धाच्या वेळी त्यांच्या जीवनात आलेले अनुभव सांगताना विद्यार्थी व शिक्षक यांच्या डोळ्यात अश्रु जमले. तसेच २६ जानेवारी या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली म्हणुन संविधान हा एक पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे माणसांना माणसासारखे जगण्याचा अधिकार मिळाला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. ना. म. साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे भांडार होते म्हणुन संविधान लिहु शकले असे प्रतिपादन केले.
पाहुण्यांचे स्वागत प्रा. सारंग गणबोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. आण्णासाहेब थोरात, ग्रंथपाल सविता तांबे , ऋषिकेश थोरात, प्रविण शेलार, प्रतीक्षा दळवी, अश्विनी शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी मोभारकर यांनी तरआभर प्रा. सचिन तरटे यांनी केले.
हे हि वाचा : history: खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !