शेवगाव |७ नोव्हेंबर | लक्ष्मण मडके
Education एकत्र बसुन खाल्लेले डब्बे, परिक्षांच्या निकालाची भिती, बोर्डाची परिक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या आणि मैदानावर रंगलेले खो-खो, कबड्डीचे सामने असा आठवणींनी भारावून टाकणारा शैक्षणिक प्रवास आणि त्या आठवणीत तब्बल १९ वर्षांनी भरवलेल्या वर्गात भेटलेल्या वयाच्या पस्तीशीतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विद्यार्थी जीवन अनुभवले. निमित्त होते, बाळासाहेब भारदे विद्यालयातील २००५ च्या १० वीच्या वर्गाच्या स्नेहमेळाव्याचे.
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे विद्यालयातील Education वर्ष २००४-०५ मधील इयत्ता १० वीच्या वर्गाचा स्नेहमेळावा नुकताच मोठया उत्साहात पार पडला. यावेळी ६० पैकी ५५ विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली. यावेळी उमेश घेवरीकर, सुधीर आपटे, अमृत गोरे, किरण शेळके, भाऊसाहेब शिंदे, वर्गशिक्षिका वैशाली जुन्नरकर आदी गुरुजनांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी मनिषा आजबे, योगिता डाके, अंजली आढाव, मनिषा गवळी, राणी गर्जे, सुनिता भुकेले, मोनिका सुपारे, अलिम शेख, संतोष नेमाणे, रामेश्वर ढिसले, मोबिन तांबोळी, गणेश दिशीत या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी बोलतांना जुन्या आठवणी व येथील शिक्षण संस्काराचा आयुष्यातील प्रवासात झालेला उपयोग याबाबत आपापली मनोगत व्यक्त केली.
यावेळी घेवरीकर, आपटे, गोरे, शेळके, जुन्नरकर या शिक्षकांनी विद्यार्थी व शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेची इमारत, वर्ग, क्रीडांगण, आनंदवन येथील वेगवेगळ्या आठवणींनी विद्यार्थ्यांना गहिवरुन आले.
यावेळी प्राचार्य सरोदे म्हणाले, माझे विद्यार्थी आजही समाजातील विविध क्षेत्रामध्ये उच्चपदावर पोहचून विद्यालयासह गावाचे नाव उज्ज्वल करत आहे. शाळेने दिलेले संस्कार जपतांना वेळोवेळी शाळेच्या मदतीसाठी धावून येतात.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास ११ खुर्च्या भेट दिल्या. घंटावाजून सकाळी ११ वाजता भरलेला वर्ग, त्यामधील तासिका, गृहपाठ, हजेरी व चुकार विद्यार्थ्यांना छड्या देखील देवून सायंकाळी ५ वाजता सुटला. मनोज गुजर, सोमनाथ कर्डीले, संतोष लांडे, सुभाण शेख, शामल लोहीया, अमोल पालवे, महेश मिसाळ, नय्युम पठाण, श्रीकांत शिंदे, संदीप लांडगे, बंडू जगताप, जीवन परदेशी, संजय जोशी, फहीम सौदागर, अभिजीत करवंदे, ज्योती दुधाळ, सुरेखा इंगळे, अर्चना आढाव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अलीम शेख, सुत्रसंचालन अंजली आढाव यांनी तर सोमनाथ घोंगडे यांनी आभार मानले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.