Education: श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ‘हिंदी भाषा दिन’ उत्साहात साजरा

69 / 100 SEO Score

पाथर्डी | १६ सप्टेंबर | पंकज गुंदेचा

Education  तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात १४ सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संपुर्ण कार्यक्रमाचे निवेदनासह आयोजन हिंदीमधून करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक विजय भताने होते.

अनुश्री राजळे, सायली बाबर, चैतन्य बर्डे, राजळे सोनाली, राजनंदिनी राजळे, सृष्टी कवळे, कार्तिकी पवार, दिव्या निकाळजे, खंबायत, प्रतीक्षा शिंदे यांनी हिंदी कविता, देशभक्तीपर गीत, कहानी यामधून राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व याबाबत सादरीकरण केले.

विद्यालयातील हिंदी विषयाचे शिक्षक शिवाजी लवांडे यांनी राष्ट्रभाषा ‘हिंदीचे महत्व उपयोग आणि आवश्यकता’ याविषयी तसेच हिंदी भाषेचे समृद्ध साहित्य व कहानीकार, उपन्यासकार मुन्शी प्रेमचंद तसेच कबीर, रहीम, जयशंकर प्रसाद, मैथिलीशरण गुप्त, हरिवंशराय बच्चन, अटलबिहारी वाजपेयी यांचे हिंदी भाषेतील योगदान सांगितले.

 कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषयाच्या शिक्षिका शेख तबस्सूम, कारले, विद्या गोबरे, राजश्री दुशिंग, राजेंद्र वांढेकर, शंकर बरकडे, सचिन पवार, अमोल लवांडे आदींनी केले.

किर्ती भांगरे, मनिषा जाधव, जयश्री वाघमोडे, शिक्षकेतर कर्मचारी संजय गायकवाड, भाऊसाहेब औसेकर, संजय आठरे, संजय शिंदे, प्रशांत अकोलकर आदींनी केले तर आभार अभयसिंह चितळे यांनी मानले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *