अहमदनगर महाविद्यालयास रॅली आयोजनाचा मान
अहमदनगर | ४ फेब्रुवारी | पंकज गुंदेचा
(education) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या कारकीर्दला यंदा ७५ वर्षे पूर्ण करत आहे. विद्यापीठाने आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधक, प्राध्यापक, लेखक, विचारवंत, राजकीय नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी, खेळाडू, व्यावसायिक दिले. या दैदिप्यमान विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त विद्यापीठाकडून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे आजोजन होत आहे.
(education) उपक्रमांचा एक भाग म्हणून अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. अहमदनगर महाविद्यालयास रॅलीच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.
रॅलीचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते व पद्मश्री पोपट पवार यांच्या विशेष उपस्थितीत होत आहे. रॅलीची सुरुवात ता. ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७.३० वाजता वाडियापार्क येथून होत आहे तर समारोप सकाळी १०.३० वाजता अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे.
यावेळी डॉ राजेंद्र विखे पाटील, अध्यक्ष, अमृत महोत्सव समिती, डॉ. संदीप पालवे, जिल्हा मार्गदर्शक, सायकल रॅली आयोजन समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन, सिनेट, अधिसभा पदाधिकारी, जिल्हास्तरीय सायकल रॅली नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
सर्वांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे साक्षी बनावे, असे आवाहन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस यांनी केले आहे.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर