नगर तालुका | १५ जुलै | प्रतिनिधी
(Culture) तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे आज मंगळवारी ता. १५ रोजी सायंकाळी लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. आषाढ महिन्याच्या निमित्ताने आयोजित या यात्रेला पंचक्रोशीसह इतर भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.
(Culture) गावातील लक्ष्मीआई मंदिरात दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी छबुराव लहारे, लक्ष्मण लहारे, अशोक लहारे, गंगाधर चव्हाण, सुभाष लहारे, बापू बेरड व ग्रामस्थांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेच्या दिवशी लक्ष्मीआईच्या घागरीची पारंपरिक मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विशेष आकर्षण ठरले ते ११ पोतराज, ज्यात भाऊसाहेब उडानशिवे, निखिल गाडे, नवनाथ चांदणे, लखन हिरवे आदी सहभागी झाले होते.
(Culture) यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीमाता मंदिरासमोर आयोजित या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. संपूर्ण यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
