पुणे | १३ जुलै | प्रतिनिधी
(Cultural Politics) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर ता. १३ जुलै रोजी अक्कलकोट येथे एका पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे व त्याच्या साथीदारांनी शाईफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संभाजी ब्रिगेडने याचा तीव्र निषेध करताना या घटनेला पूर्वनियोजित राजकीय गुन्हा आणि सरकारपुरस्कृत दहशतवाद अशी तीव्र संज्ञा दिली आहे.
(Cultural Politics) संघटनेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून दीपक काटे यांच्याकडून “संभाजी ब्रिगेडचे नाव बदला, अन्यथा घरात घुसून मारू” अशी धमकी दिली जात होती. या पार्श्वभूमीवर या हल्ल्याला गांभीर्याने न घेतल्यास पुढील धोके संभव आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(Cultural Politics) संभाजी ब्रिगेडने असा सवाल उपस्थित केला आहे की, जर सरकारने डाव्या विचारांच्या संघटनांवर ‘जनसुरक्षा कायदा’ लागू केला आहे, तर उजव्या विचारसरणीच्या गुंडांवर तो कायदा का लागू होत नाही? दीपक काटे याच्या विरोधात यापूर्वीही पुणे विमानतळावर बंदुकीसह अटक, इंदापूर एमआयडीसीमध्ये खंडणीप्रकरणे आणि इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे.
संघटनेच्या मते, हा हल्ला फक्त प्रविणदादा गायकवाड यांच्यावर नव्हता, तर तो शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मांडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अस्मितेवर होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केलं की, “आता आम्ही केवळ निषेध करणार नाही, जशास तसे उत्तर दिलं जाईल.”
