अहमदनगर | २३ जून | प्रतिनिधी
(Cultural Politics) हिंदू धर्म व राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविणाऱ्या ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने शिल्पकार आणि चित्रकार प्रमोद कांबळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार फोंडा येथील सनातन संस्थेच्या वतीने देण्यात येतो.
(Cultural Politics) ता. १७ ते १९ मे दरम्यान फोंडा, गोवा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात अहमदनगरचे प्रमोद कांबळे यांची निवड करण्यात आली.
(Cultural Politics) नंदकुमार जाधव यांनी नगर येथे प्रत्यक्ष येऊन कांबळे यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी कांबळे यांनी म्हटले, या पुरस्कारामुळे माझ्या कार्याला मान्यता मिळाली असून हे माझ्यासाठी सन्मानास्पद क्षण आहे. आगामी काळात आणखी प्रेरणादायी कार्य करण्यासाठी यामुळे ‘बळ’ मिळेल.
प्रमोद कांबळे यांच्या कलाकृतींमध्ये स्वामीनारायण मंदिरासाठी तयार केलेले स्वामीनारायण यांच्या जीवनावरील १० भव्य सेट्स, ‘सारे जहां से अच्छा’ या शीर्षकाखाली ५०० महान भारतीय व्यक्तींचे पेन्सिलस्केच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मूर्ती, शिर्डीतील ७० फूट उंच साईबाबा मूर्ती, तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिर परिक्रमा मार्गावर तयार झालेल्या १२५ चित्ररथांचा समावेश आहे. कांबळे यांच्या कार्याला रा.स्व.संघाकडून मिळालेली ही पावती आहे.
