अहमदनगर | १९ जून | प्रतिनिधी
(Cultural Politics) सावेडी भागातील पोलिसकॉलनी ओपनस्पेसमधील आयप्पा मंदिराचा वर्धापनदिन उत्सवात साजरा झला. यावेळी कलशपूजा, कलशाभिषेक करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष के.के. शेट्टी यांनी दिली. वर्षभर होणारी देवाच्या मूर्तीची होणारी जीर्णता काढून त्यामध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करून मंत्रोपचारात देवांना त्या पाण्याने अभिषेक केला जातो. त्यामुळे मूर्तीमध्ये चैत्यन्य निर्माण होते. यासाठी कलशपूजा करून कलशाभिषेक करण्यात आला.
(Cultural Politics) अय्यप्पा स्वामी, गणपती व सरस्वतीचे ३ मुख्य कलश तसेच अय्यप्पा स्वामीचे २५ कलश, गणपतीचे ९ कलश, सरस्वतीचे ९ कलश पूजन करण्यात आले. त्यातील आयुर्वेदिक पाण्याने मंत्रोपचारात तीनही मूर्तीना अभिषेक करण्यात आला.
