मुंबई | २७ मे | प्रतिनिधी
(Cultural politics) आजच्या आधुनिक युगात महापुरुषांच्या विचारधारेतूनच आपल्याला सामाजिक समतेचा, न्यायाचा मार्ग सापडतो. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, प्रत्यक्ष आचरणात आणल्यास खरे परिवर्तन साधता येईल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
(Cultural politics) मंत्रालयात आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर समाजसुधारक व विचारवंतांना अभिवादन करण्यात आले.
(Cultural politics) यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

