Cultural Politics | समरसता बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्षपदी शोभा जोशी

३० जानेवारी रोजी ग्रंथदिंडीने प्रारंभ

SubEditor | Dipak Shirasath

पिंपरी | २५.१ | प्रदीप गांधलीकर

(Cultural Politics) १३ व्या समरसता बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी ता. ३० जानेवारी २०२६ रोजी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे संपन्न होणाऱ्या या एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन आ. शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबाळकर व नवनिर्वाचित नगरसेविका शालिनी गुजर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

(Cultural Politics) ३० जानेवारी रोजी सकाळी ०९:३० वाजता शाळेच्या आवारात ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ करण्यात येणार असून उद्घाटन सत्रानंतर अनुक्रमे विवेकानंद सुतार, संगीता पुराणिक, राजन लाखे आणि अश्विनी बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना सत्र, विद्यार्थी कविसंमेलन, विद्यार्थ्यांशी साहित्य गप्पा आणि कथाकथन या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

(Cultural Politics) ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी यांनी आजवर मुलांसाठी अनेक बालकविता, गाणी लिहिली असून त्यांचा ‘डब्यातला लाडू’ हा बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्षा मानसी चिटणीस यांनी केले आहे.

 

Share This Article