(Crime) तनिशा ऊर्फ ईश्वरी सुशांत भिसे या ७ महिन्यांच्या गरोदर महिला, क्रिटिकल अवस्थेत उपचाराची गरज असताना, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.सुश्रुत घैसास यांनी ‘१० लाख आधी भरा, मगच उपचार’ अशी अट घातली. ५ तास ३० मिनिटे कोणतेही उपचार न करता पेशंटला फक्त पैशांसाठी वेठीस धरले गेले. शेवटी पेशंटचा मृत्यू झाला.
(Crime) याविषयी अधिक माहिती देताना विजय कुंभार म्हणाले, ससून रुग्णालयाच्या चौकशी अहवालानंतर अखेर FIR दाखल करण्यात आला. जबाब ता. १९ एप्रिल २०२५. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर वैद्यकीय हलगर्जीपणा आणि अमानवीय वर्तन यामुळे कारवाई. हा प्रकार फक्त तनिशाचा नाही, उद्या कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो. ‘हॉस्पिटल म्हणजे उपचार केंद्र की वसुलीचं ठिकाण?’ उत्तर द्या, महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय प्रशासन.