मुंबई | १८ जुलै | प्रतिनिधी
(Crime) महाराष्ट्र विधीमंडळाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात आले. या घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आक्रोश व्यक्त करत विधीमंडळात जोरदार निदर्शने झाली.
हे ही पहा : आ. जितेंद्र आव्हाड आंदोलनाचा व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा
(Crime) या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हल्लेखोर मोकाट सुटतो आणि ज्याच्यावर हल्ला झाला त्यालाच अटक केली जाते, ही गोष्ट म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी आहे. सत्तेचा माजच यातून दिसतो. मात्र आम्ही या जुलमाविरुद्ध रस्त्यावर उतरणार आहोत आणि शेवटपर्यंत लढत राहू.
(Crime) पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करत दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली असून अन्याय्य पद्धतीने अटक करण्यात आलेल्या नितीन देशमुख यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
