मुंबई | २० एप्रिल | प्रतिनिधी
(Business) येथील मंत्रालयात ता.१७ रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Retd.) यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध प्रस्तावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
(Business) बैठकीत संस्थेस भाडेपट्ट्याने मिळालेल्या जमिनीचे भाडेकरार नूतनीकरण करताना मुद्रांक शुल्क माफ करणे, आश्रमशाळा आडोशी ता.मोखाडा, जि.पालघर येथील जागा आश्रमशाळेच्या नांवावर करणे, कामोठे ता.पनवेल येथील शाळेचे अतिक्रमण नियमाकुल करणे, न्यू इंग्लिश स्कूल मार्केटयार्ड, पनवेल विद्यालयासाठी भाडेपट्ट्याने जागा देणे, कर्मवीर भाऊराव पाटील सातारा या विद्यापीठाचे विषय, विना-अनुदानित तुकड्याच्या टप्पा अनुदानाबाबतच्या विषयावर चर्चा झाली.
(Business) बैठकीस डॉ. राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त (नियोजन), राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (महसूल), बी. वेणूगोपाल रेड्डी अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण), डॉ. के.एच. गोविंदराज प्रधान सचिव (नगर विकास), सौरभ विजय सचिव (वित्त), डॉ. राजेश देशमुख सचिव (मा. उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय), राजेंद्र भारूड प्रकल्प संचालक, (राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान), डॉ. रजनिश कामत (कुलगुरू डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी), मंगेश चितळे आयुक्त, पनवेल महानगरपालिका, सुप्रिया धावरे सहसचिव (विधी व न्याय) आदी मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, बाळाराम पाटील, व सचिव विकास देशमुख IAS (Retd.) आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : Social | ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.