Art: रचना कला महाविद्यालय २६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न; १३५० विद्यार्थ्यांचा सहभाग

छायाचित्र - एक्स्प्रेस फोटो, अहमदनगर

अहमदनगर | १ सप्टेंबर | पंकज गुंदेचा

Art दिवंगत चित्रकार ए.जी.शेकटकर संस्थापक असलेल्या रचना कला महाविद्यालयाचा २६ वा वर्धापनदिन आज रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १३५० विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धा दादा चौधरी विद्यालय येथे पार पडल्या.

त्याचबरोबर शासकिय चित्रकला (इलीमेंटरी, इंटरमिजीएट) ड्रॉईंग ग्रेड परिक्षेसाठी उपयुक्त असे स्मरणचित्र, वस्तुचित्र व संकल्पचित्र या विषयावरील चित्रकार कै.ए.जी.शेकटकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. स्पर्धा व प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी ता.८ सप्टेंबर २०२४ रोजी रचना कला महाविद्यालय, सांगळेगल्ली, अहमदनगर, येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या संचालिका वर्षा शेकटकर व प्राचार्या जबिन शेख यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *