माऊंट सिनाय कॉन्व्हेंटस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
नगर तालुका|२५ डिसेंबर|अतुल देठे
(Education) तालुक्यातील सारोळाबद्दी येथील माऊंट सिनाय कॉन्व्हेंटस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बोल्हेगाव येथील सनराईज इंग्लिश मेडियम स्कूलचे संचालक सुहासकुमार देठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व मुख्याध्यापिका जयश्री खरात यांच्या प्रार्थनेने झाली. यावेळी विद्यालयाचा हेड बॉय अमानत शेख व व्हाईस हेड गर्ल वैष्णवी म्हस्के यांनी विद्यालायचा वार्षिक अहवाल सादर केला.
(Educatin) कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘सामाजिक जाणीव’ या संकल्पनेवर आधारित वृक्षतोड, समाजमाध्यमाचे दुष्परिणाम, महिला सबलीकरण, क्रीडा, जाहिराती आदी विषयावर समूह नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे सुहासकुमार देठे यांनी सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमातही सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. शेवटी ख्रिसमसनिमित्त येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा नाटिकेद्वारे सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
रेणुका बानिया यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षिका नेहा केदारे यांनी आभार मानले तर उज्वला पंडित यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे संचालक डॉ.शाम खरात, मुख्याध्यापिका जयश्री खरात, संस्थेचे विश्वस्त ज्योती हासे, राजेश चक्रे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षिकांनी प्रयत्न केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर