राहुरी | प्रतिनिधी | २५ डिसेंबर
Ahilyanagar News नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीमधून शाहू विद्यालय खडांबे ता. राहुरी यांना एक अत्याधुनिक दर्जाचा पोडियम सेट भेट दिला गेला. यामुळे विद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळास कार्यक्रम घेण्यास मोठी मदत होणार आहे.
हा अत्याधुनिक पोडीअम सेट मिळवण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक आप्पासाहेब शिंदे यांनी परीश्रम घेतले.आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यालयास केलेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक नरवडे सर व विद्यालयातील इतर शिक्षक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
अत्याधुनिक पोडिअम सेट प्राप्त झाल्यानंतर त्याचे विद्यालयातर्फे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे हि वाचा : “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?