कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांची संकल्पना
जामखेड | १४ डिसेंबर | रिजवान शेख
Cultural Politics कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळके आणि पिंपळगाव उंडा या गावातील अनुसूचित जाती-जमातीतील गहू पीक उत्पादक शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी ‘SC-SP प्रकल्पा’अंतर्गत बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना गहू पीक उत्पादन वाढीसंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
Cultural Politics कर्जत-जामखेडचे आमदार पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, विविध उपाययोजना राबवल्या जातात, त्यासाठी शेतीविषयक तज्ज्ञांना बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचाच भाग म्हणून ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती, आघारकर संशोधन केंद्र आणि कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेडमधील जवळके आणि पिंपळगाव उंडा या गावांमध्ये अनुसूचित जाती-जमातीतील गहू उत्पादक शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील बियाण्याचे वाटप करण्यात आले. जवळके गावातील ३५ शेतकऱ्यांना आणि पिंपळगाव उंडा येथील १५ शेतकऱ्यांना या उपक्रमातून बियाणे देण्यात आले. यावेळी रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि बदलत्या हवामानातील आव्हानांवर मात करत शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी डॉ.विवेक भोईटे, आघारकर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.विजेंद्र बाविस्कर आणि पीक रोग शास्त्रज्ञ डॉ.सुधीर नवाथे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.भोईटे यांनी रब्बी हंगामातील पीक नियोजन, तूर व कांदा पिकांवरील व्यवस्थापन व वातावरणाशी जुळवून घेत उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ.बाविस्कर आणि डॉ.नवाथे यांनी गव्हाची लागवड, नवनवीन विकसित वाणांची माहिती तसेच गहू पिकावरील रोग व कीड नियंत्रण आणि त्यावरील उपाययोजनांवर शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र आणि आघारकर संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला तसेच जवळके विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन कांतीलाल वाळुंजकर, पिंपळगाव उंडाचे माजी सरपंच मच्छिंद्र भालेराव, प्रगतशील शेतकरी साळवे, प्रकल्प समन्वयक ओंकार ढोबळी, रमेश पवार यांसह जवळके व पिंपळगाव उंडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमामुळे अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची नवी दिशा मिळाली. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास व्यक्त यावेळी व्यक्त करण्यात आला.
यापूर्वीही राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड मतदारसंघात शेतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. गेली पाच वर्ष तूर, कांदा, द्राक्ष, डाळिंब, उडिद यासह विविध पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच आवश्यक त्या ठिकाणी आभ्यास दौरे काढून आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचे दृश्य परिणाम दिसून आले आहेत. विशेषतः कांदा, तूर, उडिद या पिकांच्या बाबतीत कर्जत जामखेड मतदारसंघात अमुलाग्र बदल होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ घेतली आहे. हे सर्व राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत याचे यश आहे.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?