अहमदनगर | १५ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Event अहमदनगर शहरात ‘व्हिजन नगर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी ता. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता सावेडी उपनगरातील ‘द कॅस्टल रेस्टॉरंट’ गोल्ड जिमसमोर, प्रोफेसर चौक याठिकाणी करण्यात आले. कार्यक्रमाचे सादरीकरण प्रसिद्ध वास्तुविशारद अर्शद शेख करणार असून लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन पीस फाउंडेशन, रहेमत सुलतान फाउंडेशन, भारतीय जनसंसद , आणि सकल भारतीय समाज या सामाजिक संस्थांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२०८३२०६, ९४२२२२२३३२ आणि ९८२२०२३६०९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.