अहमदनगर | १५ नोव्हेंबर | पंकज गुंदेचा
Cultural Politics जैन धर्माचा चातुर्मास ता.१५ रोजी संपत असून साधू साध्वी भगवंतांचा विहार पदभ्रमण चालू होत आहे. ते मोठ्या प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातून पदभ्रमण करत असतात. त्यांचा विहार सुखरूप, सुरक्षित व्हावा यासाठी मिशन सेफ विहार राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, महावीर निर्वाण कल्याणाक महोत्सव समिती अशासकीय सदस्य, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ महाराष्ट्र समिती सदस्य, व ऑल व जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडिया सदस्य इंजि. यश शहा यांनी जिल्हाधिकारी यांना ई-मेल व फोनद्वारे विनंती केली होती. या विनंतीला यश आले असून जिल्हाधिकारी यांच्यावतीने उचित कारवाईचे आदेश दिले आहेत.
अधिक माहिती देताना शहा यांनी सांगितले, १५ तारखेपासून चातुर्मास समाप्तीनंतर तात्काळ अल्पसंख्यांक जैन साधू साध्वी गुरु भगवंत यांचे विहार पदभ्रमण चालू होत आहे. या पदभ्रमण विहार दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात आपण जिल्हा पोलीस प्रशासन तसेच या संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना तात्काळ सूचना कराव्यात की विहारादरम्यान पोलीस संरक्षण. आवश्यक असेल त्या ठिकाणी जिल्ह्यात शासकीय शाळा, महाविद्यालय, कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या काही कालावधी करिता विहार दरम्यान मुक्कामाची सुविधा, प्रवचन करिता ‘सार्वजनिक ठिकाणी’ जागा उपलब्ध करून द्यावी.
जिल्हाधिकारी कार्यालयाने इंजि. शहा यांच्या ईमेलची दखल घेत उचित कारवाईची विनंती जिल्हा पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त आणि जिल्हा परिषद सिईओ यांना केली.
तसेच शहा यांनी मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, अल्पसंख्यांक विभाग यांना देखील संपूर्ण महाराष्ट्रात विहार दरम्यान पोलीस सुरक्षा देण्यासंदर्भातील पत्र पाठवले आहे. शहा यांच्या ईमेलचे दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ या संदर्भात संबंधित गृह विभाग शाखेला कळवले देखील आहे, अशी माहिती इंजि. यश प्रमोद शहा यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9270112223 या क्रमांकावर संपर्क करावा.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर