केडगाव | ६ नोव्हेंबर | नरहरी शहाणे
येथील प्रभाकरम फौंडेशनच्या वतीने केडगाव उपनगर तसेच चास, नेप्ती परिसरात वृक्षारोपण करून स्व. ratan tata यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परिसरातील लोकप्रतिनिधी व निसर्गप्रेमी सहभागी झाले. प्रभाकरम फौंडेशनचे अध्यक्ष विपुल तापकीर म्हणाले, आजकाल ओंजळ भरल्यानंतर समाजाला देणारे बरेचजण आहेत, पण ओंजळ भरायची आणि तीच समाजाला दान करायची असे मूल्य सरांनी आयुष्यभर जोपासले. रतन सरांनी २२ व्या शतकातील भारताचा पाया रोवला आहे. भविष्यात भारत जेव्हा विश्वगुरू ‘बनेल’ तेव्हा त्यात सर्वात जास्त श्रेय सरांचे असेल.
फौंडेशनने वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब अशा ५३ झाडांचे वृक्षारोपण केले. मार्गदर्शक हेड कॉन्स्टेबल रवि टकले, उपाध्यक्ष अभिषेक थोरात, सौरभ शर्मा, शिवम थोरात, दिनेश पांढरे, निखिल बहिरट, सौरव बल्लाळ यांत्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. निसर्गप्रेमी व लोकप्रतिनिधींनी वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा