Politics: राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांचे अभिष्टचिंतन - Rayat Samachar
Ad image

Politics: राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांचे अभिष्टचिंतन

69 / 100

राहुरी | १८ सप्टेंबर | प्रतिनिधी

Politics शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रा.काँ.श.प.च्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आ. तनपुरे यांना वाचनीय पुस्तके व शालेय साहित्य देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले तसेच पुढील राजकीय जीवनास शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात आदर्शवत ठरणारा असा हा अभिष्टचिंतन सोहळा ठरला.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

 आमदार प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आलेली शालेय साहित्य व पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्यात आला. फुले, बुके, शाल या खर्चिक गोष्टींना फाटा देऊन आदर्श उपक्रम राबविला.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे यांच्यावतीने आमदार तनपुरे यांना पुस्तके व शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले. यावेळी राहुल जाधव, चंद्रकांत जावळे, राहुल दहातोंडे आदींसह इतर मान्यवर आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकास्तर व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment