Politics: 'कुकडी’ भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वहिवाट मोजणी करण्याचे आदेश; आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश - Rayat Samachar
Ad image

Politics: ‘कुकडी’ भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वहिवाट मोजणी करण्याचे आदेश; आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

67 / 100

कर्जत | ५ सप्टेंबर | रिजवान शेख, जवळा

Politics कुकडीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी वहिवाट मोजणी करणे आवश्यक असून त्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. वहिवाट मोजणी प्राप्त होताच प्रांताधिकारी कार्यालयामार्फत उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. याबाबत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी आणि त्यावरील शाखा कालव्यासाठी कर्जत तालुक्यातील ५४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले. परंतु गेल्या २०-२५ वर्षांपासून हे शेतकरी भुसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत. आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीमध्ये भुसंपादनाचा मोबदला मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राशीन, जळकेवाडी, कोरेगाव, येसवडी, तळवडी, बारडगाव दगडी, धालवडी, चापडगाव, वडगाव, तनपुरा, पिंपळवाडी, होलेवाडी, आळसुंदे, बेनवडी, कोळवडी, करपडी, राक्षसवाडी बुद्रुक, करमणवाडी, डोंबाळवाडी, माळंगी, कानगुडवाडी, राक्षसवाडी खुर्द, करपडी, रौकाळेवाडी, कुळधरण, वायसेवाडी, आंबीजळगाव, लोणी, मसदपूर या गावातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून १७२ कोटी रुपये मोबदला मिळवून दिला आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर या सरकारने भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबतच्या निकषात बदल केले आहेत. मूल्यांकनाच्या आधारे हा मोबदला देण्यात येणार असून याबाबतचे प्रस्ताव या वेळखाऊ तांत्रिक कारणांनी रखडले आहेत. ते वेगाने मंजूर व्हावेत आणि शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानुसार जलसंपदा विभागाच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आलेली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी अनेकदा शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोळवडी कार्यालयात बैठका घेतल्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी व कुकडी सिंचन मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला. या प्रश्नांवर विधीमंडाळतही वेळोवेळी आवाज उठवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आमदार पवार यांनी भेट घेऊन कुकडीचे भूसंपादनाचे प्रस्ताव मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

बऱ्याचशा गट क्रमांकामध्ये खातेफोड झालेली नसल्याने व आपआपसात संमती होत नसल्याने सहमतीऐवजी वहिवाट मोजणी केल्यानंतर खरेदीखतांची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. बहुतांश शेतकरी हे स्वखर्चाने वहिवाट मोजणीची मागणी करत असल्याने त्यानुसार वहिवाट मोजणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने वहिवाट मोजणी पूर्ण करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांना देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे कर्जतमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना कुकडीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

‘‘महाविकास आघाडी सरकारकडून कुकडीच्या भूसंपादनाचा १७२ कोटी रुपये मोबदला मिळवून दिला. परंतु अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला आणि मोबदल्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास उशीर होतोय. या कामाला गती देण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु असून त्याचाच भाग म्हणून तातडीने वहिवाट मोजणी करण्याच्या सूचना राज्य सरकाने दिल्या आहेत. जमिनीचे भुसंपादन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी माहिती आमदार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment