ज्येष्ठ पत्रकार सॉलोमन गायकवाड यांच्यासह नऊ ज्येष्ठांचा केला सन्मान
अहमदनगर | २३ ऑगस्ट | प्रतिनिधी
आपल्या वैयक्तिक आयुष्याचा गाडा हाकताना, निस्पृहपणे, कोणत्याही परताव्याची अपेक्षा न बाळगता, समाजासाठी विशेष योगदान देणार्या कृतकर्मी Senior Citizens ज्येष्ठांची दखल घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यांचे कौतुक, प्रशंसा करण्याचा; त्यांना मनोबल आणि आधार देण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.
याच विशेष दिवसाचे औचित्य साधून गुड समॅरिटन ग्रुप आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, पिंपरी चिंचवड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्या ज्येष्ठांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिले, कुटुंब व्यवस्थेस धार्मिक व सामाजिक जोड देत योग्य दिशा दिली, अशा दहा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता टिकवत सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी केलेला त्याग, बलिदान व समर्पण याची कृतज्ञपणे दखल घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न गुड समॅरीटन ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यासमयी शिरीष हिवाळे, राजन नायर, सुभाष पाडळे आणि ॲड.विवेक दौंडे यांनी ज्येष्ठांना प्रोत्साहन देत आपले विचार प्रभावीपणे मांडले.
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रेव्ह.प्रताप कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक रेव्ह.रमेश साळवे, ज्येष्ठ पत्रकार रेव्ह.सॉलोमन गायकवाड, सुवार्तिक पा.प्रेमचंद लोंढे, गीतकार, संगीत विशारद, कवी किशोर हिवाळे, एस.कौर कांग, लेखिका संध्या जोगळेकर, क्रीडापटू, निसर्गमित्र, व्यवसाय मार्गदर्शक रा.रेव्ह.बिशप अजितकुमार फरांदे, रॉयल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रा.रेव्ह.बिशप जोसेफ हिवाळे आणि ज्येष्ठ समाजसेवक सुधीर हिवाळे या दहा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.
या विशेष प्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शिरीष हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, ज्येष्ठ व्यावसायिक रेव्ह.सुभाष पाडळे, ॲड.विवेक दौंडे, बिशप मायकल राज नाडर, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदचे अध्यक्ष डेव्हिड काळे आणि पा.बन्यामीन काळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी आपल्या मनातील दडलेल्या भावना व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पा.बन्यामिन काळे यांनी केले तसेच नियोजन पा.सॅमसन चोपडे, सि.अर्पणा कामठे, पा.पिटर सोनावणे, सि.सुलोचना इंगळे, ब्र.प्रशांत भालशंकर, पा.संतोष वाघमारे आणि ब्र.डेव्हिड काळे यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा